नवी देहली – सीमा हैदर हिच्यावर आतंकवादविरोधी पथक लवकर कारवाई करणार असेल, तर ठीक आहे, अन्यथा करणी सेना तिला देशाबाहेर पाठवेल, अशी चेतावणी करणी सेनेचे उपाध्यक्ष मुकेशसिंह रावल यांनी दिली आहे.
टाईम्स नाऊ नवभारत
रावल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना सांगितले की, मी सीमा हैदर हिला आतंकवादी म्हणेन. भारतात प्रवेश करण्यापूर्वी तिची कोणतीही पडताळणी झाली नव्हती. आता तिची नीट चौकशी झाली पाहिजे. ती भारतात तिची ४ मुले घेऊन कशी आली ? सीमाने म्हटले आहे की, तिला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. मग असे असतांना भारतात येण्याची काय आवश्यकता होती ?