उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू

चमोली (उत्तराखंड) – येथील अलकनंदा नदीजवळ ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. चमोलीच्या उप पोलीस अधीक्षकांनी सांगितले, ‘अपघाताच्या ठिकाणी लोखंडी कुंपणामध्ये विद्युत् प्रवाह उतरल्यामुळे अनेकांना विजेचा धक्का बसून १५ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत काम चालू होते. त्याठिकाणी अचानक वीज प्रवाहित झाल्यामुळे काही लोकांचा त्यात मृत्यू झाला, असा दावाही केला जात आहे.’ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, घटनेच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.