जेथे-जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे-तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या ! – आमदार श्री. राजू मामा भोळे

दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार श्री. राजू मामा भोळे यांची पांडववाड्याच्या मुक्तीसंदर्भात विशेष प्रतिक्रिया

पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेला जळगाव येथील ‘पांडववाडा’ !

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे. मागच्या ५ सहस्र वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला, तर जेथे-जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे-तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत.

आमदार श्री. राजू मामा भोळे

पांडववाडा या नावावरूनच आपल्याला हा हिंदूंचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे हे लक्षात येते. जो जुना इतिहास आहे तो कोणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार श्री. राजू मामा भोळे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.