भारताला ‘इंडिया’ नाव ब्रिटिशांनी दिल्याने आपल्याला वसाहतवादी गोष्टींपासून मुक्त व्हायला हवे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

हिमंता बिस्व सरमा

नवी देहली – आपल्या देशातील संस्कृतीमध्ये आजपर्यंत झालेला लढा हा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ याभोवतीचा आहे. ब्रिटिशांनी आपल्या देशाला ‘इंडिया’ हे नाव दिले. अशा वसाहतवादी गोष्टींपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला हवा. आपले पूर्वज ‘भारता’साठी लढले आणि आपणही भारतासाठीच काम करत राहू, असे ट्वीट आसाममधील भाजप सरकारचे हिमंता बिस्व सरमा यांनी केले आहे. भाजपविरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने आघाडी स्थापन केल्यावरून सरमा यांनी हे ट्वीट केले आहे.

संपादकीय भूमिका 

भारत सरकारने अधिकृतरित्या देशाचे ‘भारत’ हे नाव घोषित करून ‘इंडिया’ नाव रहित केले पाहिजे, असेच भारतियांना वाटते !