अन्य एका व्यक्तीने मेकअप करून नेपाळ सीमेवरून सीमा आणि तिची मुले यांना भारतात घुसवले !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. तसेच गुप्तचर विभागही अन्वेषण करत आहे. त्यांच्या अन्वेषणातून सीमा हैदर हिला नेपाळमार्गे भारतात पोचण्यासाठी तिसर्या व्यक्तीने साहाय्य केल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीच्या साहाय्याने तिने पूर्ण सिद्धतेने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. सीमा हैदर ग्रामीण भारतातील महिला दिसेल, असा तिला मेकअप करण्यात आला. त्यासाठी व्यावसायिक मेकअपवाल्याचे साहाय्य घेण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षादलांच्या नजरेतून सुटण्यासाठी तिने मुलांची वेशभूषाही पालटली होती. ‘मुले भारतीय वाटायला हवीत’, याची काळजी घेण्यात आली.
Seema Haider sought the help of professionals in the make-up, intelligence sources told India Today.#SeemaHaider (@aajtakjitendra) https://t.co/78rm5PjTVT
— IndiaToday (@IndiaToday) July 19, 2023
१. सीमा शुद्ध हिंदी बोलत आहे. यावरूनही नेपाळमधील पाकिस्तानी व्यक्तींनी तिला प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे. पाकिस्तानी व्यक्ती नेपाळमध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन भारतात अवैधरित्या कारवाया करण्यासाठी पाठवत असतात.
२. सीमा हिने १३ मे या दिवशी भारत-नेपाळ सीमा ओलांडल्याचा दावा केला आहे. भारत-नेपाळ सीमेवरील सुनोली सेक्टर आणि सीतामढी सेक्टरमधून सीमाने भारतात प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. या भागातून तिसर्या देशाच्या नागरिकाने सीमा ओलांडल्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे आता अन्वेषण यंत्रणा सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पडताळत आहेत.