चर्चगेट (मुंबई) येथील बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणाची उच्‍चस्‍तरीय चौकशी होणार !

चर्चगेट परिसरातील उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभागाच्‍या अखत्‍यारितील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका विद्यार्थीवर बलात्‍कार करून तिची हत्‍या झाल्‍याच्‍या प्रकरणाची सरकारकडून उच्‍चस्‍तरीय चौकशी घोषित करण्‍यात आली आहे.

तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी !

असे कृत्य करणार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !

रेल्‍वे फाटकांऐवजी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करून वाहतूक सुरक्षित करणार ! – उदयनराजे भोसले

राज्‍यातील ९ उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा आणि ११ उड्डाणपुलांचा भूमीपूजन सोहळा नुकताच पार पडला. लोकार्पण झालेल्‍या उड्डाणपुलांपैकी २ उड्डाणपूल हे सातारा जिल्‍ह्यातील आहेत. जिल्‍ह्यातील एका भुयारी मार्गाचेही भूमीपूजन झाले.

‘ऑनलाईन’ खेळाच्या नावाखाली हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र !

पाकला जन्माची अद्दल घडवल्यास भारतातील अर्ध्याहून अधिक समस्य आपोआप संपतील. पाकवर कारवाई करण्यासाठी भारत सरकार कधी पावले उचलणार ?

सातारा येथील राजवाडा बसस्‍थानक परिसरातील शिवशिल्‍प उद़्‍घाटनासाठी शिवशिल्‍प समितीची अनुमती आवश्‍यक !

यामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांचेही एक शिल्‍प निर्माण करण्‍यात आले आहे; मात्र या शिल्‍पाला शहरातील काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्‍यामुळे हे शिवराज्‍याभिषेक शिल्‍प आणि त्‍यासह इतर शिल्‍पे कापडाने झाकून ठेवण्‍यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्‍याच्‍या मागणीसाठी १०० हून अधिक ‘होर्डिंग्‍ज’ !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० व्‍या राज्‍याभिषेकदिनाचे औचित्‍य साधत पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.

चीनची आक्रमकता पहाता भारत आणि अमेरिका यांनी एकत्र काम करावे !

चीनच्या आक्रमक कम्युनिस्ट पक्षाच्या समोर लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे.

(म्‍हणे) ‘शासनाला महाराष्‍ट्रात दंगली हव्‍या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्‍हाड, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्‍ट्रात वारंवार दंगली घडवल्‍या जातील. जे चांगले चालले आहे, त्‍यात वातावरण बिघडवण्‍याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्‍या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी व्‍यक्‍त केली.

(म्‍हणे) ‘मी छत्रपती संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्‍हणणार !’ – शरद पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

शहराच्‍या नावाला मला ‘संभाजीनगर’ म्‍हणायचे नाही, तर ‘औरंगाबाद’च म्‍हणायचे आहे, असे विधान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी ७ जून या दिवशी येथे केले. छत्रपती संभाजीनगर येथील सौहार्द या कार्यक्रमाच्‍या वेळी ते बोलत होते.

परभणी येथे छेड काढणार्‍या धर्मांधाला मारहाण केल्‍याप्रकरणी मुलीवर आणि तिला साहाय्‍य करणारे यांवर गुन्‍हा नोंद !

परभणी-पाथरी रस्‍त्‍यावरील असलेल्‍या एका अभ्‍यासिकेमधून अभ्‍यास करून जाणार्‍या विद्यार्थिनीची छेड काढली म्‍हणून एका धर्मांधाला मारहाण करण्‍याची घटना घडली; परंतु या घटनेत ज्‍या मुलीची छेड काढली त्‍याच मुलीवर मारहाणीचा गुन्‍हा नोंदवण्‍याचा प्रताप मानवत पोलिसांकडून करण्‍यात आला आहे.