तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी !

प्रेयसीशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची केली हानी

तिरूपत्तूर (तमिळनाडू) – येथे गोकुळ नावाच्या ३० वर्षीय व्यक्तीने प्रेयसीशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी येथे रेल्वे रुळांची पाहणी केली असता सिग्नल बॉक्स खराब झाल्याचे आढळले.

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी गोकुळ याला मद्यधुंद अवस्थेत पाहिले. त्याची चौकशी केली असता त्याने आधी सिग्नल बॉक्स खराब केल्याचे नाकारले; मात्र नंतर बॉक्स खराब केल्याचे मान्य केले. प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर राग आल्याने त्याने तसे केल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

  • असे कृत्य करणार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !