छत्रपती संभाजीनगर – शहराच्या नावाला मला ‘संभाजीनगर’ म्हणायचे नाही, तर ‘औरंगाबाद’च म्हणायचे आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७ जून या दिवशी येथे केले. छत्रपती संभाजीनगर येथील सौहार्द या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रवासाच्या संदर्भात काढलेल्या आठवणीत त्यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे; पण राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आहेत. त्यामुळे २ समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही.