१ जून ते ३१ जुलै या काळात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी !

 

नवी मुंबई – पावसाळ्यात मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने १ जून ते ३१ जुलै या २ मासांसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाने बंदी घातली आहे. या बंदीकाळामुळे उरणच्या करंजा आणि मोरा या बंदरावर शेकडो मासेमारी बोटी किनार्‍यावरच लावण्यात आलेल्या आहेत. बोटींचे पावसापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना काढली जात आहे. मासेमारी बंदीचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

स्थानिक आणि किनारपट्टीवरील मासेमारांना काही नियमांचे पालन करत मासेमारी करता येते; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने घातलेली बंदी आणि तिचे नियम भंग केल्यास विभागाकडून कारवाई करण्यात येते. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.