पारगाव (पुणे) येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी मुली आणि महिला यांना विनामूल्य दाखवला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ

पारगाव (जिल्हा पुणे), ३ जून (वार्ता.) – सालू मालू येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी युवकांनी ‘शिवतेज मित्र मंडळा’च्या वतीने गावातील महिला आणि युवती यांना ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट विनामूल्य दाखवला. ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे, या हेतूने हा चित्रपट विनामूल्य दाखवल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले.

हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करतानी महिला आणि युवती

या वेळी धर्मप्रेमींनी ‘हिंदु राष्ट्र स्थापना प्रतिज्ञा’ स्वतः हून मागवून घेतली आणि चित्रपटगृहात चित्रपट झाल्यानंतर सर्वांकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करवून घेतली. तसेच या वेळी उपस्थित प्रत्येक महिला आणि युवती यांना धर्मप्रेमी युवकांनी ‘हिंदु जनजागृती समिती’चा ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट दिला. तसेच ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून स्वतःचे रक्षण होण्यासाठी ग्रंथ कसा उपयुक्त आहे ? हेही ते प्रत्येक महिलांना आवर्जून सांगत होते.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ग्रंथाच्या  ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : http://SanatanShop.com