देहली येथील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि देशात ‘लव्ह जिहाद बंदी’ कायदा लागू करावा !

तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !

निवेदन देताना धर्माभिमानी हिंदू आणि निवेदन स्वीकारताना तहसीलदार श्री. गिरीश वखारे (उजवीकडे)

नंदुरबार – देहली येथील साक्षी या निष्पाप अल्पवयीन बालिकेची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. वरील घटना ही संपूर्ण मानवजातीस काळीमा फासणारी असून या घटनेमुळे संपूर्ण भारतवर्ष हादरून गेले आहे. लोकशाही असलेल्या देशात स्त्री स्वातंत्र्याचे वाभाडे निघत असून अशा प्रकारांना कायदेशीर मार्गाने प्रतिबंध घालण्याची कठोर तरतूद असतांनाही अल्पवयीन बालिका, स्त्रिया यांवर होणार्‍या अत्याचारात सतत वाढ होत आहे. अशा प्रकरणात दोषींना कठोर शासन देण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यामुळे समाजात कायद्याची भीती राहिलेली नाही, असे निदर्शनास येते. देहली येथील घटना लांच्छनास्पद असून केंद्रशासनाने अशा प्रकरणात संशोधन करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्याचे प्रावधान केले आहे. अशा परिस्थितीत देहली शासनाने वरील घटनेची सखोल चौकशी करून, पुरावे गोळा करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच लव्ह जिहाद या विषयावर लवकरात लवकर आभ्यास करून लव्ह जिहाद बंदी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशा मागण्या समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार श्री. गिरीश वखारे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आल्या.

या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. विजय सोनवणे, सौ. सीमाबाई भोई, सौ. रत्ना कलाल, सखुबाई भोई, उशाबाई भोई, लताबाई भोई, श्री. नरेंद्र पाटील, श्री. गणेश जोहरी, श्री. सनी जोहरी, विश्व हिंदु परिषदेचे सेवा प्रमुख डॉ. शांतीलाल पिंपरी, श्री. सौरभ कलाल, श्री. गणेश शिवदे, श्री. रोहित सूर्यवंशी, श्री. मयुर भोई, श्री. राकेश भोई, श्री. संतोष वानखेडे, श्री. गोकुळ मिस्त्री, श्री. हिरालाल भोई, श्री. आकाश भोई, विश्व हिंदु परिषदेचे तालुका प्रखंड उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पाडवी, प्रखंड मंत्री श्री. ऋषिकेश बारगळ, श्री. चिंतामण जोहरी, श्री. सचिन भोई, श्री. हेमंत जोहरी, श्री. भरत भोई, श्री. अमन जोहरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल मराठे उपस्थित होते.