हडपसर (जिल्हा पुणे) येथे २ सहस्र किलो गोमांस जप्त !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक )

हडपसर (जिल्हा पुणे) – सोलापूर रोड वरून कोंढवा येथे टेम्पोने गोवंशाचे मांस विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार नुकताच मंगेश चिमकर, ओंकार जाधव, शादाब मुलाणी आणि निखिल दरेकर यांनी हडपसर येथील पुलावर २ सहस्र किलो गोमांस असलेला टेम्पो पकडला आणि पोलिसांच्या साहाय्याने सदर टेम्पो हडपसर पोलीस ठाण्यात जमा केला. या प्रकरणी मंगेश चिमकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टेम्पोचालक बबलू सय्यद, अंकूश खंडागळे यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना !