केशवनगर येथील मुळा-मुठा नदीच्या विकासन प्रकल्पाच्या नावाखाली वाळूचा अवैध उपसा चालू !

वाळूचोरीचा प्रश्न गंभीर असून शासनाने दोषींवर त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे !

प्रतिकात्मक चित्र

मुंढवा – शहराचे पुरापासून संरक्षण व्हावे, हे ‘नदी परिसर विकास प्रकल्पा’चे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्प नुकताच चालू झाला आहे; मात्र याचा अपलाभ घेऊन वाळू माफिया रात्री अवैध पद्धतीने वाळूउपसा करत आहेत. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत वाळू माफियांचे काम सक्रीयपणे चालू आहे; मात्र प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे या वाळू माफियांना नक्की कुणाचे अभय आहे ? नदीपात्रातून होत असलेल्या वाळूचोरीचा शोध लावणार का ? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. वाळू चोरांवर योग्य ती कारवाई करून खटले नोंद करावेत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.