एरंडोल (जिल्हा जळगाव) येथील दुकानाच्या पत्त्यात मशिदीचा उल्लेख करण्यासाठी धर्मांधाचा दबाव !  

मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घातला असता, तर समस्त निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी आकाशपाताळ एक केले असते. ही टोळी आता कुठे आहे ?

खडकवासला (जिल्हा पुणे) येथे अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीचा अपघात होऊन तरुणाचा मृत्यू !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर यांनी सांगितले की, अपघाताविषयी माहिती मिळाली असून नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल. 

‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ बसवण्याची आवश्यकता !

माळढोक पक्ष्यांच्या अधिवासातून जाणार्‍या विजेच्या तारांना ‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ हे यंत्र लावल्यास पक्षी विजेच्या तारांना धडकण्यापासून वाचू शकतात. विद्युत्वाहक तारांना लावलेल्या या यंत्रामुळे पक्षी सुमारे ५० मीटर अंतरावरून उड्डाणमार्ग पालटू शकतात. 

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? कि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ? याची चौकशी होऊन संबंधितांवर, तसेच हे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने पलूस येथे शोभायात्रा !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

पुणे येथील पेशवेकालीन तुळशीबागेत हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा

श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे आणि दागिने घालण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली.

पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावते ! – रशियाच्या माजी सुरक्षारक्षकाचा खुलासा

शिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावत आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते इतरांना ज्ञात नसलेल्या रेल्वेगाडीने प्रवास करतात.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एका दिवसाच्या खानपानासाठी ९७ सहस्र २२२ रुपयांची तरतूद !

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानात खानपानासाठी एका वर्षासाठी साडेतीन कोटी रुपये, तर उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानात खानपानासाठी एका वर्षासाठी दीड कोटी रुपये इतक्या अंदाजित रकमेच्या तरतुदीला सरकारकडून मान्यता देण्यात आली.

कर्करोग आणि हृदयविकार या आजारांवरही वर्ष २०३० पर्यंत लस येणार !

कर्करोग आणि हृदयविकार या आजारांवर वर्ष २०३० पर्यंत लस बनवण्यात येईल, असा दावा अमेरिकेतील तज्ञांनी केला. ‘मॉडर्ना’ या औषध निर्मिती करणार्‍या आस्थापनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी म्हणाले की, आमचे आस्थापन येत्या ५ वर्षांत सर्व प्रकारच्या रोगांवर औषध देऊ शकेल.

मुंबईत ३ आतंकवादी शिरल्याचा मुंबई पोलिसांना दूरभाष !

दुबईवरून ७ एप्रिलला पहाटे ३ आतंकवादी मुंबईत शिरल्याची आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती संपर्क करणार्‍याने दिली आहे.