दैनिक ‘सनातन प्रभात’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘सनातन प्रभात’मध्ये सात्त्विकता असल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेले अनेक साधक आध्यात्मिक स्तरावर चैतन्य मिळण्यासाठी त्याचा वापर करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ‘ते साधकांना कसे घडवत आहेत ?’, याविषयीचे लिखाण कृतज्ञतापूर्वक देत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या कार्याचे आधारस्तंभ असलेले मोहन बेडेकर यांचे देहावसान !

येथील सनातनचे साधक मोहन केशव बेडेकर (वय ६७ वर्षे) यांचे ८ एप्रिल या दिवशी सकाळी ११.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने देहावसान झाले. मोहन बेडेकर हे प्रथम श्रेणी वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते.

साधकांवर विश्वास ठेवून त्यांना गुरुसेवेच्या संधी उपलब्ध करून देऊन घडवणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

मी सद्गुरु स्वातीताईंना ‘सोलापूर येथे सेवेसाठी येत आहे’, असे कळवले. त्या वेळी सद्गुरु स्वातीताईंनी माझी विचारपूस केली आणि माझे येण्याचे नियोजन विचारले. तेव्हा ‘सद्गुरु ताई सूक्ष्मातून आशीर्वाद देत आहेत’, असे मला वाटत होते

हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे होणार्‍या व्यापक धर्मकार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात आल्याचे छायाचित्रात दिसणे; पण संतांच्या अस्तित्वामुळे ‘त्या निष्प्रभ होऊन निघून गेल्या’, असे जाणवणे

‘१५.२.२०२३ या दिवशी सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जयभवानी प्रशालेच्या पटांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर रात्री ९.१५ वाजता आयोजित केलेल्या धर्मप्रेमींच्या बैठकीच्या आरंभी बैठकीचे छायाचित्र काढले.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे मला स्वतःच्या स्वभावात पालट करण्यात पुष्कळ साहाय्य झाले !

‘गेल्या ३ वर्षांपासून मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत आहे. दैनिकाचे वाचन केल्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो. कधी दैनिक घरी पोचायला उशीर झाला, तर माझ्या मनाला सारखी हुरहुर लागते. मी दैनिकातील गुरुजींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) लिखाण वाचते.

रत्नागिरी येथील कु. शौर्य गांगण (वय १० वर्षे) याला देवता आणि संत यांच्या छायाचित्रासंदर्भात आलेल्या अनुभूती

सत्संगात श्रीकृष्णाचे छायाचित्र दाखवून ‘त्याच्याकडे पाहून काय जाणवते?’ असे विचारले. तेव्हा ते छायाचित्र जिवंत असल्याचे जाणवले आणि श्रीकृष्ण बोलत असल्यासारखे वाटले.

तक्रारदार आणि साक्षीदार फितूर असतांनाही अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणार्‍या सद्दाम शहा याला २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

साक्षीदार फितूर असतांनाही अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणार्‍या सद्दाम शहा याला २५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.एस्. हातरोटे यांनी सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील माधव बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

घराणेशाहीमुळे येणार्‍या हुकूमशाहीला भाजपने पूर्णविराम दिला ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

भाजपने या देशातील घराणेशाहीमुळे होणारे राजकारण आणि हुकूमशाही यांना पूर्णविराम दिला आहे. यापूर्वी राजकारणामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार यांचे आरोप सत्ताधार्‍यांवर होत होते. गेल्या ९ वर्षांमध्ये असा कुठलाही आरोप केंद्रातील राजकारणात कुणावरही झालेला नाही.

अनधिकृत आधुनिक वैद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी ! – सातारा जिल्हाधिकारी

अनधिकृत आधुनिक वैद्यांना शोधण्यासाठी तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी पोलीसदलाच्या साहाय्याने जिल्ह्यातील अनधिकृत आधुनिक वैद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.