एरंडोल (जिल्हा जळगाव) येथील दुकानाच्या पत्त्यात मशिदीचा उल्लेख करण्यासाठी धर्मांधाचा दबाव !  

  • हिंदूच्या दुकानावर बहिष्कार घालण्याची पोस्ट प्रसारित केली

  • धर्मांधाच्या विरोधात तक्रार !

पत्त्यामध्ये ‘पांडव वाड्याशेजारी’ याऐवजी ‘जामा मशिदीजवळ’ असा बदल करण्यासाठी धर्मांध रईस शेख हनीफ याचा दबाव !

जळगाव, ८ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील एरंडोल येथे ‘महाजन कलेक्शन’ हे  श्री. पीतांबर महाजन यांचे कापडाचे दुकान आहे. या दुकानाच्या विज्ञापनात ‘पांडव वाड्याशेजारी, एरंडोल’ असा पत्ता त्यांनी लिहिला आहे. या दुकानाचे मालक सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या दुकानाचे विज्ञापन करतात. या पांडववाड्यात अनेक वर्षांपासून ‘जामा मशीद’ नावाची मशीद बांधण्यात आली आहे. धर्मांध रईस शेख हनीफ याने या दुकानाच्या ‘पांडववाडा’ या पत्त्यावर आक्षेप घेतला आहे. त्याच्या मते हा पत्ता ‘पांडव वाड्याशेजारी’ याऐवजी ‘जामा मशिदीजवळ’ असा असायला हवा. त्यासाठी हनीफ याने थेट महाजन यांच्या विज्ञापनाच्या पोस्टवर ‘जामा मशिदविरोधी ‘महाजन कलेक्शन’ बंद करो’ असा पालट करत फलकाच्या मध्यभागी बहिष्काराचे चिन्ह टाकून ही पोस्ट सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केली आहे. (‘चोर तो चोर वर शिरजोर’ या मानसिकतेचे धर्मांध ! – संपादक)

या विरोधात दुकानाचे मालक श्री. महाजन यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात ७ एप्रिल या दिवशी भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ५०५ नुसार तक्रार प्रविष्ट केली आहे. या वेळी एरंडोल येथील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, स्थानिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. एरंडोल येथील ‘पांडव वाडा’ हा एक ऐतिहासिक वारसा असून तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. हा पांडव वाडा कह्यात घेण्याचे षड्यंत्र अनेक वर्षांपासून धर्मांध करत आहेत. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ याविरोधात न्यायालयात लढा लढत आहेत.

संपादकीय भूमिका

  • पौराणिक वास्तूंची ओळख पालटण्यासाठी हिंदूंवर दबाव टाकणारे उद्दाम धर्मांध ! अशांना कायद्याने धडा शिकवण्यासाठी जागरूक नागरिकांनी संघटित होणे आवश्यक !
  • केवळ दबाव टाकून धर्मांध थांबत नाहीत, तर थेट हिंदूंच्या व्यवसायावर बहिष्कार घालण्याच्या पोस्ट थेट प्रसारित करतात. हिंदु मात्र त्यांच्यावर अन्याय होत असूनही कधीच पुढचे पाऊल उचलत नाहीत !
  • मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घातला असता, तर समस्त निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी आकाशपाताळ एक केले असते. ही टोळी आता कुठे आहे ?