
पलूस (जिल्हा सांगली) – श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हनुमान मंदिर येथून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून जाऊन शिवतीर्थ येथे समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत ५ सहस्रांहून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, धारकरी सहभागी झाले होते. रामानंदनगर येथेही श्रीराम मंदिरात उत्सव साजरा करून शोभायात्रा काढण्यात आली. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०६.२०२६)
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !