सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हिंदूंनी धर्माचरण सोडल्याने आणि राजकारणी भ्रष्ट झाल्याने आपत्काळ उद्भवला आहे. या काळात टिकून रहाण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाखाली प्रखर साधना करून धर्मसंस्थापनेच्या कार्यात झोकून द्या’ – ह.भ.प. सदाशिव पाटील यांचे आवाहन.

टाय घालणारे वैद्य !

‘काही वैद्य आता इंग्रजी भाषेत आयुर्वेद शिकवतात आणि दवाखान्यात सात्त्विक धोतर इत्यादीऐवजी पँट, शर्ट, टाय घालतात. त्यांचे अनुकरण करून उद्या मंदिरांतील पुजारी पँट घालायला लागले, तर आश्चर्य वाटणार नाही ! हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ एप्रिलपासून जोतिबा देवस्‍थान (कोल्‍हापूर) येथील यात्रेस प्रारंभ !

दख्‍खनचा राजा म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या श्री जोतिबा देवस्‍थान येथील जोतिबा देवाच्‍या यात्रेस १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. १ एप्रिलला धार्मिक विधी आणि पालखी प्रदक्षिणा यांना प्रारंभ होत आहे.

#Exclusive : किमान स्वच्छता ठेवण्याविषयीही जळगाव बसस्थानकाची अनास्था !

बसस्थानकांची विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल !

भारतद्वेष्‍ट्ये नि काँग्रेसप्रेमी अमेरिका अन् जर्मनी !

लोकशाहीची हत्‍या करणारी अमेरिका आणि जर्मनी यांना राहुल गांधी यांच्‍या निलंबनावरून भारताला सुनावण्‍याचा कोणता अधिकार ?

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र दंड वसूल

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र ९८४ रुपये दंड वसूल करण्‍यात आल्‍याची माहिती एन्.एम्.एम्.टी.चे व्‍यवस्‍थापक तथा उपायुक्‍त योगेश कडूसकर यांनी दिली.

नवी मुंबईत श्री रामनवमी उत्‍सव उत्‍साहात साजरा !

नवी मुंबईत ठिकठिकाणी श्री रामनवमी उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. तुर्भे गाव येथील संत श्री रामतनुमाता मंदिर येथे विश्‍वनाथ कृष्‍णाजी सामंत ट्रस्‍टच्‍या वतीने श्री रामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात आला.

ममता बॅनर्जी यांचा हिंदुद्वेष जाणा !

रामनवमीच्‍या दिवशी जर तुम्‍ही मुसलमानांच्‍या भागात जाऊन आक्रमण कराल, तर तुमच्‍यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्‍या मिरवणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर हिंदूंना दिली.

देवा, गळो आता सत्‍वर अहंभाव हा ।

‘मी’, ‘माझे’, ‘मला’ अशा प्रकारच्‍या अहंच्‍या विचारात गुरफटून कृती करणार्‍या माझ्‍या अहंभावी मनाला जाणीव करून देण्‍यासाठी मला काही ओळी सुचल्‍या.

फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवणे टाळावे !

‘घरामध्‍ये बिस्‍किटे, शेव, चिवडा, फरसाण असे फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवल्‍यास जेव्‍हा त्‍या पदार्थांकडे लक्ष जाते, तेव्‍हा ते खाण्‍याचा मोह होतो. त्‍यामुळे अवेळी असे पदार्थ खाल्ले जातात.