सातारा जिल्ह्यात महावितरणकडून १० सहस्र ३७६ शेतकर्‍यांच्या शेती पंपांना विद्युत् पुरवठा

शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री विजेरी घेऊन शेताच्या बांधावर जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील नवीन रामेश्वर मंदिर येथे श्री रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा !

सौ. ज्ञानदा बुरसे-पंडित या स्वतः उच्चशिक्षित असूनही मोठ्या वेतनाच्या चाकरीचा पर्याय न निवडता त्यांनी किर्तन सेवेतून धर्मप्रसाराचा मार्ग निवडला आहे.

खटाव (जिल्हा सातारा) तलाठी आणि खासगी व्यक्तीला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

तलाठी बर्गे यांनी तक्रारदार यांना ५ सहस्र रुपये झेरॉक्सच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. नंतर तलाठी बर्गे रक्कम घेण्यासाठी आल्यावर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

सातारा येथे ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आर्.टी.ई.) १ सहस्र ८२१ प्रवेश जागांसाठी ४ सहस्र ४८८ अर्ज

बालकांना विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रतिवर्षी सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे २२ रुग्ण !

जिल्ह्यात आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे, तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सोलापूरला गोहत्यामुक्त करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महाआरती !

श्री सिद्धरामेश्वरांची पावन भूमी ही गोहत्यामुक्त व्हावी, तसेच गोरक्षकांना गोहत्या रोखण्यासाठी बळ मिळावे यासाठी दाजी पेठ येथील नागनाथ मंदिरात साकडे घालून महाआरती करण्यात आली.

गोव्याच्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांवर सर्वाधिक खर्च

अर्थसंकल्पानुसार राज्याचा सर्वाधिक खर्च सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन, निवृत्तीवेतन, ग्रेच्युईटी आदींवर खर्च होत आहे, तर राज्याला सर्वाधिक महसूल राज्य सरकार आकारत असलेल्या करांतून आणि अन्य महसूल मिळणार आहे.

गोवा : चोर्ला घाटाकडे जाणारा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद

गोवा-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक १ वरील चोर्ला घाट अवजड व्यावसायिक वस्तूंच्या वाहनांना २० सप्टेंबर २०२३ पर्यंत रात्री १० ते सकाळी ५ वगळता अन्य वेळी प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी, उत्तर गोवा यांनी मनाई केली आहे.

‘म्हादई’ व्याघ्र संरक्षण क्षेत्र अधिसूचित करा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

‘‘म्हादई अभयारण्य परिसरात ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती आहे, तो भाग वगळून अन्य परिसर हा व्याघ्र संरक्षण क्षेत्र म्हणून अधिसूचित केला जाऊ शकतो. राजकारणासाठी म्हादईचा बळी देऊ नये, अन्यथा त्याचे संपूर्ण गोव्याला परिणाम भोगावे लागतील.’’

गोवा : सरकारची प्रोत्साहनपर योजना बंद होऊनही मातृभाषेतील शाळांसाठी अर्ज येणे चालूच !

राज्यात वर्ष २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षासाठी मराठीतून पहिली इयत्ता चालू करण्यासाठी १०, तर कोकणीतून पहिली इयत्ता चालू करण्यासाठी २१ अर्ज शिक्षण खात्याकडे आलेले आहेत.