नवी मुंबई, ३० मार्च (वार्ता.) – एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्यांकडून ६ लाख ८० सहस्र ९८४ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती एन्.एम्.एम्.टी.चे व्यवस्थापक तथा उपायुक्त योगेश कडूसकर यांनी दिली.
एन्.एम्.एम्.टी. परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून कर्जत, खोपोली, कल्याण, ठाणे, बोरिवली, दादर, मंत्रालय, बांद्रा, अंबरनाथ आदी ठिकाणी बसगाड्यांची सुविधा पुरवली जाते. प्रतिदिन लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे या उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्या आल्यापासून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
या सुविधेचा लाभ घेणारे जसे प्रामाणिक प्रवासी आहेत, तसे एन्.एम्.एम्.टी.ला ‘चुना लावणारे ठग’ अर्थात् ‘विनातिकीट प्रवास करणारे’ प्रवासी आहेत. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विविध मार्गांवर ३५ तिकीट तपासनीस आणि एक भरारी पथक कार्यरत आहे. यांच्याद्वारे विनातिकीट प्रवास करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
संपादकीय भूमिकातिकीट न काढणारी अप्रामाणिक जनता आदर्श राज्यव्यवस्थेत रहाण्यास पात्र तरी आहे का ? |