अनिल परब यांच्या विरोधातील फौजदारी गुन्ह्याविषयीचे आदेश रहित

परब यांचे अधिवक्ता सुधीर बुटाला यांनी न्यायालयात प्रविष्ट केलेली पुनर्विलोकन याचिका न्यायालयाने १४ मार्चला निकाली काढली.

मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी एकजूट हवी ! – शिक्षक संघटनेचे बळीराम मोरे

आमचा लढा हा सदैव प्रस्थापितांच्या विरोधात राहिला आहे. सरकार राज्य कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करणार नसेल, तर आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी सर्व शासकीय कर्मचार्‍यांची एकजूट हवी, असे मनोगत शिक्षक संघटनेचे बळीराम मोरे यांनी केले.

‘स्वाधार’ योजनेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजना चालू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा यांसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखावरील संवर्धनाचा लेप काढला !

श्रीपूजक माधव मुनीश्‍वर यांचे न्यायालयात सत्यप्रतिज्ञापत्रातून गंभीर आरोप

७५ सहस्र पदे खासगी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय !

हा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच आहे. आम्ही फक्त शिक्कामोर्तब करून मंत्रिमंडळासमोर आणला आहे. अशा पद्धतीने कंत्राटी कामगारांना भरती केले जाते; परंतु खासगीकरण करण्याचा सरकारचा कुठलाही उद्देश नाही.

महाराष्ट्रातील शिंदे आणि ठाकरे गट यांची सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात !

१५ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीत ‘तत्कालीन राज्यपालांची भूमिका ही संविधानाच्या चौकटीत होती’ असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस    

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणात चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२२ या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सलमान खान याला प्रसिद्धीसाठी नाही, तर उद्देशाने मारणार आहोत ! – कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई

एक कुख्यात गुंड कारागृहात असतांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देतो, असे केवळ भारतातच घडू शकते !

सायबर सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

योगऋषी रामदेवबाबा यांनी हिंदु तरुण-तरुणींसाठी आयोजित केला संन्यास महोत्सव !

योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.