तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस    

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसतांना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक, तसेच गोदामात तांदळचा साठा करून ठेवणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. आमदार शिरीष चौधरी यांनी हा प्रश्‍न विचारला होता.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणात चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२२ या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २ आरोपींना अटक करण्यात आली असून अन्वेषण चालू आहे.