राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.

आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ‘ईडी’कडून अटक !

मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’ने दापोली तालुक्याचे माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना १४ मार्चला अटक केली.

सिंधुदुर्ग : कुडाळ रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता आणि पूल यांची उंची वाढवण्यासाठी ३ कोटी निधी संमत

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अर्थसंकल्पात यासाठी ३ कोटी रुपये निधी संमत झाला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

गोव्यात सलग नवव्या दिवशी वनक्षेत्रांमध्ये आग कायम ८ ठिकाणी आग अजूनही सक्रीय

म्हादई अभयारण्य आणि सत्तरी वन क्षेत्रांतील बहुतांश आग आटोक्यात आली आहे; मात्र देरोडे येथील आग अजूनही धुमसत आहे. ही आग कर्नाटक राज्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गोव्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता

हवामान खात्याने १४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या वेळी प्रतिघंटा ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाट चालू असतांना मोकळ्या जागेत राहू नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अहवालाला अटींसह तांत्रिक संमती ! – केंद्रशासनाची राज्यसभेत माहिती

केंद्रीय जल आयोगाने कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अहवालाला ‘हायड्रोलॉजी’ आणि आंतरराज्य स्थिती या आधारांवर संमती दिली आहे; मात्र यासाठी काही निकषांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे.

सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! – मुख्यमंत्री

पर्यटक जतीन शर्मा यांनी हॉटेलचा कर्मचारी रायस्टन डायस याच्या अनियंत्रित वागण्याविषयी विरुद्ध हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती आणि याचा वचपा काढण्यासाठी रायस्टनने त्याच्या साथीदारासह जतीन शर्मा यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.

समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !

‘हनुमंताने व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार्‍यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले