मुंबईत मार्चच्‍या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !

मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्‍या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्‍या शेवटी होणार आहे. बैठकीच्‍या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

बावधन (जिल्‍हा सातारा) येथील भैरवनाथाच्‍या बगाड यात्रेला छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्‍थिती !

‘ज्‍या पद्धतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात, अशीच एकी कायम रहाणे आवश्‍यक आहे, तरच या भागाचे कल्‍याण होईल. या भागाचे कल्‍याण व्‍हावे’, ही मागणी मी देवाकडे मागितली आहे, असे छत्रपती उयदनराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांशी बोलतांना सांगितले.

पंढरपूरमधील तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळले !

४ वर्षांपूर्वी तत्‍कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतून यमाई तलावाच्‍या शेजारी कोट्यवधी रुपये व्‍यय करून तुळशी वृंदावन सिद्ध केले आहे. ४ वर्षांतच मंदिर कोसळल्‍याने भाविक अप्रसन्‍न आहेत.

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या गटनेतेपदी मुख्‍यमंत्र्यांची नियुक्‍ती केल्‍याचे विधानमंडळाकडून परिपत्रक !

अशा हास्‍यास्‍पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्‍यकारभार कसा करत असेल, याची कल्‍पना येते !

रायगडावरील वास्‍तूंच्‍या जतन-संवर्धनासाठी रायगड विकास प्राधिकरणाचा पाठपुरावा !

इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, वास्‍तूशास्‍त्रीय पुराव्‍यांचा आधार घेऊन या वास्‍तू पुन्‍हा उभ्‍या करणे शक्‍य आहे. अशा वास्‍तू पुरातत्‍व विभागाने किंवा जगभरातील ‘मॉन्‍युमेंट्‌स’मध्‍ये पुन्‍हा उभ्‍या राहिल्‍याचे दिसते.

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्‍यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्‍वस्‍तिक पीठा’चे पीठाधीश्‍वर, उज्‍जैन

हिंदु जनजागृती समितीने ‘सरकार अधिग्रहित मंदिरात भेदभाव का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेला विशेष संवाद !

नाशिक येथील ‘श्री हरिहर’ गडाची स्‍वच्‍छता आणि संवर्धन !

प्रत्‍येक वेळी शिवभक्‍तांना स्‍थानिक प्रशासनास का विनंती करावी लागते ? गडाचे सौंदर्य अबाधित राखून स्‍वच्‍छता आणि संवर्धन करणे हे संबंधित प्रशासनाचे कार्य नाही का ?

शेवगाव येथे छत्रपती शिवरायांविषयी लिखाणातून जातीय तेढ निर्माण केल्‍याप्रकरणी २ धर्मांधांना अटक !

धर्मांधांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी वावडे आणि औरंगजेब अन् अन्‍य मोगल आक्रमक यांच्‍याविषयी वाटणारी जवळीक धोकादायक आहे. अशांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे !

परभणी येथे ‘हलाल जिहाद-एक देशविरोधी षड्‍यंत्र’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने मार्गदर्शन !

या प्रसंगी परभणीतील २०० हून अधिक व्‍यावसायिकांची उपस्‍थिती होती. सर्वांनी ‘हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद’ ग्रंथ घेऊन जागृती करू’, असे सांगितले. या वेळी श्री. मनोज खाडये यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.

नाटू नाटू !

चित्रपट हे जागृतीचे उत्‍कृष्‍ट माध्‍यम आहे. त्‍याचा योग्‍य वापर करण्‍याची कला आणि बुद्धी असणे आवश्‍यक आहे. कोणत्‍याही चांगल्‍या विचारांच्‍या चित्रपटाला लोक प्रतिसाद देतात, हे लक्षात घेतले पाहिजे.