(म्हणे), ‘रात्री २ वाजता तरुणांना अटक का करता ?’ – जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस  

शिवसेना (शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक ‘मार्फ’ व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी ठाकरे गटातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. याविषयी १४ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातील तरुणांना रात्री २ वाजता अटक करण्यावर आक्षेप घेतला.

जुन्या पद्धतीनुसार निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !

शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांना जुन्या पद्धतीप्रमाणे निवृत्तीवेतन (पेन्शन) लागू करावे, या मागणीसाठी १४ मार्च या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले

सभागृहात मंत्री नसल्याने सभागृह स्थगित करण्याची नामुष्की येते ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांची सिद्धता करून सदस्य सभागृहात येतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करून ते त्यांचे प्रश्न सभागृहात मांडतात; मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ येते ही गंभीर गोष्ट आहे.

काँग्रेसने भारताला इस्लामी देश बनवले होते ! – भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. पण कुंभपर्वात सहभागी होणार्‍या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे.

उत्तरप्रदेशात एका उच्चशिक्षित युवतीने केला भगवान श्रीकृष्णाशी विवाह !

उरई येथील विधी महाविद्यालयात शिकणार्‍या एका मुलीने भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. ब्राह्मणांनी केलेल्या मंत्रोच्चारात युवतीने विधीपूर्वक सात फेरे घेतले. या वेळी युवतीच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या विवाहात मुलीच्या आई-वडिलांनी कन्यादानही केले.

उत्तराखंडमध्ये २६ अवैध मजारी बुलडोझरद्वारे हटवल्या !

हे अतिक्रमण करणारे आणि ते होऊ देणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा निर्यातदार  ! – भारत

काश्मीरचा राग आळवल्यामुळे भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर पाकिस्तानला चपराक लगावली आहे. ‘आंतरसंसदीय संघा’मध्ये बोलतांना प्रथम पाकिस्तानच्या प्रतिनिधीने काश्मीरचा उल्लेख केला. त्यांचे संबोधन संपल्यानंतर  प्रत्युत्तर देतांना भारताने पाकिस्तानला ‘आतंकवाद्यांचा निर्यातदार’ असे संबोधले म्हटले.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तर भारताची भरभराट होईल !’ – काँग्रेसचे नेते  सुखजिंदर सिंह रंधावा यांचा हास्यास्पद दावा !

जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !

भोपाळ वायूगळती पीडितांना वाढीव हानीभरपाई देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

भोपाळमध्ये वर्ष १९८४ मध्ये झालेल्या वायूगळती दुर्घटनेतील पीडितांना वाढीव हानीभरपाई देण्याची मागणी करणार्‍या निर्णयावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वर्ष २०१० मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

आमची बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.