शेतकर्‍यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन !

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.