‘आय.एम्.एफ्.’चा पाकिस्तानवर विश्‍वास नाही ! – पाकचे माजी अर्थमंत्री इस्माईल

पाकचे माजी अर्थमंत्री इस्माईल

इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (आय.एम्.एफ्.चा) पाकिस्तानवरील विश्‍वास उडाला आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी केले. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून पाकला कर्ज देणे थांबवले होते. ही प्रक्रिया चालू करण्यासाठी इस्माईल यांनी हातभार लावला होता. अलीकडेच त्यांनी पाकच्या जीओ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या वेळी ते म्हणाले की, पाक सरकारने आंतरराष्ट्रीय नाणे निधीसमवेतचा महत्त्वाचा करार मोडला आणि देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला. गेल्या दीड वर्षात आपण तीनदा आश्‍वासने दिली आणि नंतर ती मागे घेतली. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असतांना तत्कालीन अर्थमंत्री हाफीज शेख यांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधीसमवेत वचनबद्धता करार केला होता. ‘आय.एम्.एफ्.’ने पैसे देताच शेख यांचा त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे ‘आय.एम्.एफ्.’ची फसवणूक झाली. त्यानंतर ‘आय.एम्.एफ्.’ ने पैसे देणे बंद केले, असेही इस्माईल यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

पाकला घरचा अहेर !