हज समितीच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा देणार नाही ! – सरकारचे स्पष्टीकरण

पणजी, १० मार्च (वार्ता.) – राज्यातील हज समितीच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा दिला जाणार नाही; मात्र त्यांना इतर सर्व सुविधा दिल्या जातील, असे स्पष्टीकरण गोवा सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

यापूर्वी गोवा सरकारने हज समितीच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा, त्यांच्या दिमतीला ५ कर्मचारी, एक वाहन, हज समितीसाठीच्या आर्थिक प्रावधानांमध्ये वाढ करणे आणि वर्ष २०२४ पर्यंत गोव्यात ‘हज हाऊस’च्या उभारणीसाठी पायाभरणी करणे आदी आश्वासने दिली होती.

हज समितीच्या अध्यक्षांना १ कोटीचे आर्थिक प्रावधान देणे, हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी घेतलेला निर्णय असल्याचे फळदेसाई यांनी म्हटले होते.


हे वाचा –

हज समितीच्या अध्यक्षांना मिळणार राज्यमंत्रीपदाचा दर्जा !
https://sanatanprabhat.org/marathi/660022.html

गोवा : हज समिती अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यावर फेरविचार करा !
https://sanatanprabhat.org/marathi/660496.html