सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !

इफ्तार पार्ट्यांवरही बंदी !

मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी . . . भारतात कधीतरी असे होईल का ?

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या रमझान मासाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे.

(सौजन्य : न्यूज एक्स) 

सौदीच्या इस्लामी प्रकरणाचे मंत्री शेख डॉक्टर अब्दुल लतीफ बिन अब्दुलअजीज अल-अलशेख यांच्याकडून १० सूत्री निर्देश प्रसारित करण्यात आले आहेत. यामध्ये नमाजपठण थोडक्यात आणि रात्री पूर्ण वेळेत करण्यासह मुलांना मशिदीत न आणण्याच्या निर्देशांचा समावेश आहे.

_______________________________________

संपादकीय भूमिका 

भारतात कधीतरी असे होईल का ?