रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगड राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले ते खासदार होते. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत.
रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगड राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले ते खासदार होते. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत.
कारागृहात अटकेत असणार्याला सर्व प्रकारची अनुमती घेऊन अंतर ठेवून काही मिनिटांसाठी भेटण्याचा नियम असतांना आमदाराची पत्नी थेट त्यांच्या समवेत कशी सापडते, याचे उत्तर जनतेलाही ठाऊक आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांत मोठ्या एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. देहली-मुंबई द्रुतगती मार्गावरील राजस्थानमधील दौसाच्या धनावद गावात आयोजित एका कार्यक्रमात या द्रुतगती मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
फेसबुकवरून अल्लाचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बांगलादेशातील रंगपूर सायबर लवादाने परितोष सरकार या हिंदु तरुणाला ५ वर्षांचा कारावास आणि ३० सहस्र टका (बांगलादेशी चलन), म्हणजे २३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ईशनिंदेच्या प्रकरणात हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले व आरोपीला निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली.
तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.
आध्यात्मिक शिक्षण, म्हणजे न दिसणार्या गोष्टी शिकणे. तथापि या गोष्टी शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवल्या जात नाहीत. तेथे केवळ नोकरी-व्यवसायासाठी शिकवले जाते- ‘टाइम्स’ समूहाचे समीर जैन
बांधकाम पाडण्यासाठी संंबधितांना नोटीस बजावण्यात आली आहे; मात्र बांधकाम पाडले, तर अवैध बांधकाम झाल्याचे पुरावे नष्ट होणार नाही का ? यामुळे सर्वांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशीही प्रतिक्रिया शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !
१२ व्या शतकातील कदंब राजसत्तेच्या काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि पुरातन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेले गोव्यातील श्री सप्तकोटीश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे.