पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करून बलात्कार !

इब्राहिम मंगरियो आणि त्याच्या सहाकर्‍यांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. आता ते पुन्हा अपहरण करण्याची धमकी देत आहेत.

भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांच्याकडून जे आदेश येतात, तेच मी सांगतो ! – बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्‍न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.

(म्हणे) ‘श्रीराम मद्यपान करत होते, त्यांना आदर्श कसे म्हणावे ?-कर्नाटकातील लेखक के.एस्. भगवान

पाकिस्तानमध्ये अल्ला, पैगंबर, कुराण आदींचा अवमान करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली जाते. तशी शिक्षा आता भारतातही हिंदु धर्माच्या संदर्भात करण्याचा कायदा केंद्रातील भाजप सरकारने करावा.

चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !

कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.

पाकमधील ईशनिंदा कायद्यातील शिक्षा अधिक कठोर केल्यावरून पाकिस्तान  मानवाधिकार आयोगकडून चिंता व्यक्त !

भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान केला जात असतांना कुणालाही शिक्षा होत नाही, तर पाकमध्ये शिक्षा अधिक कठोर केली जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडले !

भारतात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याच्या अफवेमुळेही देशात आकांडतांडव केला जातो; मात्र पाकमध्ये हिंदूंची मंदिरे पाडल्यावरही कुणी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ असेल !

‘हिंदु राष्ट्रात जाती नसतील. त्यामुळे जातीमुळे आरक्षण मिळण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. राष्ट्रहितासाठी सर्व जागा गुणांवरूनच भरण्यात येतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

भारताच्या लौकिकासाठी मैदानात उतरू द्या !

खेळ, कला आदी विविध क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप हा खरोखरच चिंतेचा विषय झाला आहे. भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांमुळे राजकीय लोकांनी राजकारणाची दुर्दशा केली आहे. त्यामुळे राजकारणाला खेळ, कला आदी क्षेत्रांपासून दूर ठेवण्याची प्रगल्भता त्याच क्षेत्रातील चांगल्या नेतृत्वांनी दाखवून द्यायला हवी.