पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील साधू-संत आणि पुजारी यांच्या संघटनांनी छत्तीसगडच्या बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ एक ठराव संमत केला आहे.

यात म्हटले आहे की,  कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.

संत आणि पुजारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र दीक्षित म्हणाले की, जर कुणी वैदिक धर्माचरण करणारा आणि कथाकार यांचा अपमान करत असेल, तर आम्ही सहन करणार नाही.