चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे नाव न घेता आव्हान !

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे नाव न घेता आव्हान !

बिलासपूर (छत्तीसगड) – चमत्कार करणार्‍यांनी आधी जोशीमठ गावाला यावे आणि तेथे होणारे भूस्खलन थांबवून दाखवावे. तसे केल्यास आम्ही त्यांचा जयजयकार करू, तसेच त्यांना वंदन करू, असे आव्हान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे नाव न घेता दिले.

शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.