(म्हणे) ‘श्रीराम मद्यपान करत होते, त्यांना आदर्श कसे म्हणावे ?-कर्नाटकातील लेखक के.एस्. भगवान

कर्नाटकातील लेखक के.एस्. भगवान यांचे हिंदुद्वेषी विधान !

हिंदुद्वेषी के.एस्. भगवान

मंड्या (कर्नाटक) – श्रीराम दुपारी सीतेसमवेत बसत. दिवसभर मद्यपान करत. सीतेला वनवासात पाठवत. त्यांना सीतेची कोणतीही काळजी नव्हती. झाडाखाली बसून प्रायश्‍चित्त घेणार्‍या शांबूक याचा त्यांनी शिरच्छेद केला. मग त्यांना आदर्श कसे म्हणावे ?  असे विधान सेवानिवृत्त प्राध्यापक आणि लेखक के.एस्. भगवान यांनी केले. ते २० जानेवारी या दिवशी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

के.एस्. भगवान पुढे म्हणाले की, रामराज्य स्थापन करण्याची चर्चा होते. कुणी वाल्मीकिंच्या रामायणातील उत्तरकांडाचा अभ्यास केला, तर त्यांना श्रीराम आदर्श व्यक्ती नसल्याचे लक्षात येईल. त्यांनी ११ सहस्र वर्ष नव्हे, तर केवळ ११ वर्षे राज्य केले होते.’’

सरकारने के.एस्. भगवान यांना कारागृहात टाकावे ! – भाजपची मागणी

भगवान यांच्या विधानावर टीका करतांना कर्नाटकातील भाजपचे नेते विवेक रेड्डी म्हणाले की, ही अत्यंत अश्‍लाघ्य आणि घृणास्पद टीका आहे. त्यातून त्यांची घाणेरडी मानसिकता दिसून येते. त्यांनी ही गोष्ट अन्य एखाद्या देशात म्हटली असती, तर त्यांना काय काय पहावे लागले असते ? भारत फार सहिष्णु देश आहे; पण आम्ही आमच्या देवतांचा अवमान सहन करणार नाही. प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. सरकारने तत्काळ त्यांना गजाआड करावे.

के.एस्. भगवान यांनी यापूर्वी केलेली आक्षेपार्ह विधाने !

१. के.एस्. भगवान यांनी वर्ष २०१९ मध्येही दावा केला होता की, भगवान श्रीराम नियमितपणे मद्यपान करत होते. त्यांनी माता सीतेलाही दारू पाजली होती. याविषयी भगवान यांनी त्यांच्या पुस्तकातही भाष्य केले आहे. या पुस्तकातील काही उतार्‍यांवर वाद झाला होता. यामुळे सरकारवर त्यांना सुरक्षा पुरवण्याची वेळ आली होती. सरकारने भगवान यांच्या आक्षेपार्ह विधानांनंतर त्यांचे पुस्तक सरकारी ग्रंथालयांतून काढून टाकले होते.

२. वर्ष २०१५ मध्ये भगवान यांनी ‘मी श्रीमद्भगवद्गीतेची काही पाने जाळणार’, असे घोषित केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवला होता.

भगवान यांच्यावर झाली होती शाईफेक !

वर्ष २०२१ मध्ये के.एस्. भगवान यांच्यावर बेंगळुरूच्या एका महिला अधिवक्त्याने शाई फेकली होती. महिलेने म्हटले होते की, भगवान हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांचे तोंड काळे केले.

संपादकीय भूमिका

  • लेखक भगवान यांनी यापूर्वीही अनेकदा हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली आहेत. त्या वेळी त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न केल्याने ते सातत्याने अशी विधाने करत आहेत. कर्नाटकातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने पाहून हा हिंदुद्वेष रोखणे आवश्यक आहे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
  • पाकिस्तानमध्ये अल्ला, पैगंबर, कुराण आदींचा अवमान करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली जाते. तशी शिक्षा आता भारतातही हिंदु धर्माच्या संदर्भात करण्याचा कायदा केंद्रातील भाजप सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !
  • के.एस्. भगवान यांचे अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थांनविषयी असे प्रश्‍न विचारण्याचे धाडस कधी होईल का ?