श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वामुळे त्‍यांचा देह आणि वाहन यांत झालेले वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाच्‍या संदर्भात नाडीपट्टीमध्‍ये सप्‍तर्षींनीही गौरवोद़्‍गार काढले आहेत. या लेखाद्वारे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍यातील तेजतत्त्वाविषयीच्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती जाणून घेऊया.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीवर तळमळीने मात करणार्‍या आणि चिकाटीने समष्टी सेवा करून साधनेतील आनंद अनुभवणार्‍या अकोला येथील सौ. कमल रोठे (वय ५८ वर्षे) !

साधिकेने साधना करत असताना अनुभवलेली गुरुकृपा आणि अनुभूती

पुणे येथील पू. श्रीमती उषा कुलकर्णी (वय ८० वर्षे) यांच्या देवघरातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या छायाचित्रात झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

दत्तात्रेयांच्या आधीच्या छायाचित्रात पार्श्वभूमीचा रंग गडद निळा होता. आता तो रंग फिकट होऊन पांढर्‍या रंगाचे प्रमाण वाढले आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पूर्वज आणि वाईट शक्ती यांच्या त्रासांपासून मुक्ती देणारी देवता म्हणजे दत्तगुरु होय.सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय पादुकांचे वाराणसी सेवाकेंद्रात आगमन झाल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती 

वाराणसी सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय गुरुपादुकांचे आगमन झाले. त्या वेळी येथील साधकांना आलेल्या अनुभूती . . .

कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.

चोरीचा माल सापडलेल्या १४ दुकानांवर कारवाई !

जिल्ह्यातील शेतीची अवजारे आणि विद्युत् जनित्रामधील सुटे भाग यांच्या चोरीची प्रकरणे वाढली. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भंगाराच्या १२४ दुकानांची पडताळणी केली. त्यात नांदगाव खंडेश्वर येथील फिरोज खान यांच्या भंगार दुकानात पोलीस तक्रारीप्रमाणे शेतीचा माल मिळाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे ८७ वे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे शिवप्रतापदिन साजरा !

फैजपूर, तालुका यावल येथे श्रीराम मंदिरात शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या रणरागिणी उपस्थित होत्या.

मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला राष्ट्रपतींची संमती !

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. यामुळे मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.