चोरीचा माल सापडलेल्या १४ दुकानांवर कारवाई !

  • दोघांना अटक !

  • अमरावती येथील भंगारच्या १२४ दुकानांची पडताळणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावती, ३ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील शेतीची अवजारे आणि विद्युत् जनित्रामधील सुटे भाग यांच्या चोरीची प्रकरणे वाढली. त्यामुळे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी भंगाराच्या १२४ दुकानांची पडताळणी केली. त्यात नांदगाव खंडेश्वर येथील फिरोज खान यांच्या भंगार दुकानात पोलीस तक्रारीप्रमाणे शेतीचा माल मिळाला. निकेश घोडाम याने हा माल विकल्याने दोघांनाही अटक करण्यात आली. भंगारच्या १४ दुकानांत अयोग्य साहित्य मिळाल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करून पुढील प्रक्रिया चालू करण्यात आली.