राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा ८ डिसेंबरला समारोप !

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे ८७ वे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. येथील रेशीमबाग येथे आयोजित या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. एकाच वर्षात दोनदा संघ शिक्षा वर्गाचे आयोजन वर्ष १९५१ नंतर प्रथमच होत आहे. ६५० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत.