महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

७ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने…

श्रीदत्त – ‘उत्पत्ति, स्थिती आणि लय

पूर्वज आणि वाईट शक्ती यांच्या त्रासांपासून मुक्ती देणारी देवता म्हणजे दत्तगुरु होय. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये पितृपक्षाच्या कालावधीत हा नामजप तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसलेले साधक यांना ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. – सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), बी.ए. संगीत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांना आलेल्या अनुभूती

१ अ. सौ. अंजली अजय जोशी (वय ६० वर्षे)

१ अ १. प्रयोगाच्या आरंभी पाय प्रचंड दुखणे, नंतर सर्वकाही देवावर सोडल्यावर निर्विचार स्थिती अनुभवणे : ‘नामजप चालू झाल्यावर आरंभी माझा पाय प्रचंड दुखायला लागला. त्या वेळी माझ्या मनात ‘येथून निघून जावे’, असा विचार येत होता. मी मनाला सकारात्मक दृष्टीकोन देऊन देवावर भार सोडून डोळे मिटले. त्यानंतरचे मला काहीच आठवले नाही. मला सभोवतालचे भान नव्हते. मी निर्विचार स्थितीत होते.
मी २३ मिनिटे ध्यानावस्थेत होते.’

सौ. अनघा जोशी

१ आ. श्री. अजित तावडे

१ आ १. ‘मला भ्रूमध्यावर संवेदना जाणवून नंतर त्या कपाळावर पसरल्याचे जाणवत होते.

१ आ २. ध्वनीवर्धकावरील जप थांबल्यानंतर ‘अंतरात जप गतीने होत आहे’, असे मला जाणवले.

२. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना आलेल्या अनुभूती

२ अ. त्रासदायक अनुभूती

(‘आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना दत्ताचा नामजप ऐकतांना झालेले त्रास, हे त्यांना न होता त्यांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींना होत असतात. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना त्रास होणे, म्हणजेच या जपामुळे आध्यात्मिक त्रासावर उपायात्मक औषध लागू पडल्यासारखे आहे.’ – संकलक)
२ अ १. एक साधिका

अ. ‘मला अकस्मात् कंबरदुखी, पित्त वाढणे, तीव्र नकारात्मक विचार येणे, चिडचिड होणे, असे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागले.’

२ अ २. दुसरी साधिका

अ. ‘दत्ताचा नामजप लावल्यावर अर्धांगवायू झाल्याप्रमाणे माझे हात-पाय वाटत होते. ‘माझ्या शरिरातून कुणीतरी शक्ती खेचून घेत आहे. मला कुणीतरी जखडून ठेवले आहे’, असे मला जाणवत होते.’

२ अ ३. तिसरी साधिका

अ. ‘हा नामजप ऐकत असतांना मला गुंगी आल्यासारखे होत होते. मला इतकी ग्लानी आली की, ‘आसंदीवरून उठून तेथेच खाली झोपावे’, असे वाटत होते.

आ. या प्रयोगाच्या वेळी ‘अनेक साधकांचे पूर्वज सूक्ष्मातून आले आहेत’, असे मला जाणवत होते.’

२ अ ४. चौथी साधिका

अ. ‘मला पूर्ण गळून गेल्यासारखे झाले होते. माझे डोळे खुपत होते.’

२ अ ५. एक साधक

अ. ‘प्रयोगादरम्यान मला २ – ३ वेळा अस्वस्थता जाणवली. माझ्या घशाला कोरड पडली. मला खोकला आला.

आ. मी डोळे बंद केल्यावर मला थोडा वेळ चित्रविचित्र चेहरे आणि आकृत्या दिसल्या.’

२ आ. चांगल्या अनुभूती

२ आ १. एक साधिका

अ. ‘माझे मन अंतर्मुख झाले. माझी गुरूंना शरण जाऊन प्रार्थना झाली. मी मनाची अशी स्थिती पुष्कळ दिवसांनी अनुभवली. गुरूंची आठवण येऊन माझी काही वेळ भावजागृतीही झाली.

आ. ‘दत्तगुरूंचा मोठा हात सर्व साधकांच्या डोक्यावर आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

इ. मला माझ्या अनाहतचक्राकडे पिवळ्या रंगाचा गोळा दिसला. ‘त्या पिवळ्या गोळ्यातून शरिरात पिवळा प्रकाश पसरत आहे’, असे मला जाणवले.’

२ आ २. दुसरी साधिका

अ. ‘माझ्या पेशीपेशीत नामजपाची शक्ती जाऊन तेथील त्रासदायक आवरण नष्ट होऊन एखादी पिशवी रिकामी करावी, त्याप्रमाणे माझा देह रिकामा होत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. काही वेळातच माझा जप अंतर्मनापासून व्हायला लागून मला उत्साह आणि प्रसन्न वाटत होते.

इ. मला सेवा करतांनाही उत्साह जाणवत होता.’

२ आ ३. तिसरी साधिका

अ. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग…’ याप्रमाणे माझे मन शांत होते.

आ. रामनाथी आश्रमात सतत झालेल्या या नामयज्ञामुळे ‘साधकांच्या पूर्वजांना पुढील टप्प्यात जाण्यासाठी ऊर्जा मिळणे, साधकांच्या भोवती संरक्षककवच निर्माण होणे, पूर्वजांचे वाईट शक्तींपासून रक्षण होणे, वायूमंडलाची शुद्धी होणे’, असे अनेक लाभ झाले आहेत’, असे मला जाणवले. त्याबद्दल मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता वाटली.’

‘सनातन चैतन्यवाणी’ या ॲपवरील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकत गिरनार पर्वताच्या पायर्‍या चढतांना कसलाही त्रास न होणे

‘मी गिरनार पर्वत संपूर्ण वेळ ‘सनातन चैतन्यवाणी’ या ॲपवरील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकत चढले. त्या वेळी मला दत्तप्रभूंचे अस्तित्व सतत जाणवत होते. मला कसलाच त्रास झाला नाही. माझ्या समवेत असलेल्या काकूंना हा नामजप ऐकवल्यावर त्यांनाही तसाच अनुभव आला.’ – सौ. श्रुती आचार्य, भाग्यनगर

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’वर उपलब्ध आहे. आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. या नामजपाविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करा : https://www.sanatan.org/Chaitanyavani

हा नामजप ऐकतांना आपणास काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास ‘[email protected]’ या संगणकीय पत्त्यावर आम्हाला अवश्य कळवा.’

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.