‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे ६ प्राध्यापक ५ दिवसांसाठी निलंबित !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील शासकीय विधी महाविद्यालयातील घटना !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील शासकीय विधी महाविद्यालयातील ६ प्राध्यापकांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या प्राध्यापकांकडून कट्टरतावादी विचारसरणी, ‘लव्ह जिहाद’ आणि मांसाहार यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला होता. मिर्झा मोजीज बेग, फिरोज अहमद मीर, सुहेल अहमद वाणी, पूर्णिमा बेसे, मिलिंदकुमार गौतम आणि अमेक खोखर अशी निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.

१. ‘महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य शुक्रवारी नमाजपठणासाठी बाहेर जात असल्यामुळे शुक्रवारी महाविद्यालयात शिकवले जात नाही’, असा आरोपही अभाविपकडून करण्यात आला होता.

२. महाविद्यालयाचे प्राचार्य रहमान यांनी अभाविपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, अभाविपने ज्याप्रकारे आरोप केले आहेत, ते अत्यंत चुकीचे आहेत. महाविद्यालयात अशा प्रकारे कोणतेही वातावरण नाही; मात्र अभाविपकडून करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

महाविद्यालयाच्या ग्रंथांलयात हिंदु आतंकवादी असल्याचा आशय असणारे पुस्तक उपलब्ध !

अभाविपने या वेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवण्यात आलेले डॉ. फरहत खान यांनी लिहिलेले ‘सामूहिक हिंसा एवं दाण्डिक न्याय पद्धती’ हे हिंदी पुस्तक सादर केले. यात हिंदूंना आतंकवादी ठरण्यात आल्याचे सांगितले. याविषयी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘या पुस्तकाची चौकशी करण्यात येईल’, असे सांगत निलंबित प्राध्यपाकांची चौकशी करून २४ घंट्यांत गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिल्याचे सांगितले.

संपादकीय भूमिका

अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करणेच आवश्यक आहे ! याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, प्रत्यक्षात महाविद्यालयानेच त्यांच्याकडे लक्ष ठेवून कारवाई करणे आवश्यक होते !