‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान

भारत माझाच भाग असून त्याला मी माझ्याजवळच ठेवतो ! – सुंदर पिचाई

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) – ‘गूगल’ आणि ‘अल्फाबेट’ आस्थापनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना येथे भारतीय-अमेरिकन व्यापार आणि उद्योग प्रकारात वर्ष २०२२ साठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत संधू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निकटवर्तीय उपस्थित होते. ‘भारत हा माझाच एक भाग असून तो मी माझ्याजवळ ठेवतो’, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले.