गोव्यातील ९९ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील करण्यास वनमंत्री विश्वजित राणे यांचा आक्षेप

भौतिक विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड आणि खाण व्यवसाय पहाता, शासनाने गावातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, अशा प्रकारे ही क्षेत्रे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात आणल्यास त्यास विरोध होऊ नये !

राजकीय पक्षांनी अंतर्मुख होण्याची आवश्यकता !

‘मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभपर्व इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना येण्यासाठी पैसे देऊनही किती उपस्थिती असते ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या अभियानाला नगर जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्रिपुरारि पौर्णिमेच्या निमित्ताने समितीच्या वतीने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या अभियानाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यात २२ हून अधिक मंदिरांमध्ये दीपोत्सव, तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरांमध्ये शेंदूर भोग अर्पण करण्याचा उपक्रम संपन्न !

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील स्वरांमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश !

महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेतील ‘स्वरांमध्ये ‘ए’ नंतर ‘ॲ’ आणि ‘ओ’ नंतर ‘ऑ’ या स्वरांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता १४ स्वर लिखाणात वापरता येणार आहेत. ‘अं’ आणि ‘अः’ हे स्वरादी आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद !

अनंत करमुसे या अभियंत्याला बंगल्यावर नेऊन त्यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणामुळे, चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडून प्रेक्षकावर आक्रमण केल्याच्या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड हे चर्चेत होते.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची घेतली भेट !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे असून त्यांची भेट अविस्मरणीय होती, असे मत श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. श्री. बावनकुळे यांनी पू. भिडेगुरुजी यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मालेगाव येथील ‘पी.एफ्.आय.’चा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी याला अटक !

‘टेरर फंडिंग’प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटने’चा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी याला अटक केली आहे. १२ नोव्हेंबरच्या रात्री येथून नदवी याला चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे युवा शिबीर पार पडले ! 

सर्व युवा कार्यकर्त्यांनी सनातनच्या आश्रमात येऊन सेवा करण्याची आणि धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

आव्हाड यांच्यावरील कारवाईवरून राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अजित पवारांचा आरोप

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.