आव्हाड यांच्यावरील कारवाईवरून राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अजित पवारांचा आरोप

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड

ठाणे, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात सरकार पालटले; म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबला जात असेल, तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीही घडले नाही, तसेच ही घटना मुख्यमंत्र्यांसमोर घडली होती. त्यामुळे त्यांनी यामध्ये लक्ष घालायला हवे, असे पवार म्हणाले.