भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची घेतली भेट !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची भेट घेतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, तसेच मान्यवर

सांगली, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे असून त्यांची भेट अविस्मरणीय होती, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. श्री. बावनकुळे यांनी पू. भिडेगुरुजी यांच्या ‘दत्त निवास’ येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्या भेटीनंतर श्री. बावनकुळे यांनी हे मत व्यक्त केले. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी श्री. बावनकुळे यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले.

भेटीनंतर श्री. बावनकुळे यांनी पू. भिडेगुरुजी यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. या वेळी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, भाजपचे सरचिटणीस श्री. केदार खाडिलकर यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाचे धारकरी सर्वश्री हणमंत पवार, अंकुश जाधव, सचिन पवार, प्रफुल्ल चव्हाण, राहुल बोळाज, मंगेश तांदळे उपस्थित होते.