नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन !

२६ नोव्हेंबर या दिवशी संविधान दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधानाविषयी विद्यार्थी आणि नागरिक यांच्यामध्ये जागृती व्हावी, यासाठी निबंध, वक्तृत्व आणि घोषवाक्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील ८ वर्षीय मुलाचा ५ मिनिटे ५१ सेकंदांत शिवतांडव आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठणाचा विश्वविक्रम !

अवघ्या ५ मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठणाचा विश्वविक्रम करणार्‍या पुणे येथील ८ वर्षीय संस्कार ऋषिकेश खटावकर याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद पेटला !

भाजपच्या रिदा रशीद यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाद पेटला !

माझ्या विनयभंगाविषयी राज्य महिला आयोगाची भूमिका मला पहायची आहे ! – रिदा रशीद, महामंत्री, महिला मोर्चा, भाजप

मी सुप्रिया सुळे यांना विचारेन की, ज्या पद्धतीने माझ्याशी घटना घडली तीच परंपरा आहे का ? महिलांना असेच ढकलून देत बाजूला लोटता का ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असेच होते का ? यावर महिला आयोग काय भूमिका घेते ? हे  मला पहायचे आहे.

पुणे येथील विद्याश्रम शाळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

विद्याश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी’, या विषयावर मार्गदर्शन घेण्यात आले. याविषयी वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर यांनी मार्गदर्शन केले.

श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ‘पास’ची चौकशी करण्यात यावी !

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सिंहासन पूजा या प्रतिदिन ७ होत आहेत का ?, तसेच होत असल्यास पूजेचे बुकिंग कसे झाले ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

आळंदीमध्ये कार्तिकी यात्रा आणि ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा यांची प्रशासनाकडून सिद्धता !

२० नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) आणि २२ नोव्हेंबर या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील आरोग्याविषयीचे धक्कादायक वास्तव उघड !

रक्तदाब आणि मधुमेह यांचा त्रास वाढण्यास चॉकलेट, स्नॅक्स, फास्ट फूड, जंक फूड यांचे अतीसेवन, तसेच भ्रमणभाष, संगणक, भ्रमणसंगणक अन् दूरचित्रवाणी संच पहाण्याची सवय कारणीभूत आहे, असे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे.

आमचे सरकार कोणतीही कारवाई सूडबुद्धीने करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस नियमानुसार पडताळणी करून कार्यवाही करतात. महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल, तर आव्हाड यांच्यावर कारवाई होईल.

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हे व्याख्यान ऐकल्यावर ‘समाजातील लोकांचे व्यापक प्रमाणात प्रबोधन होण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करूया’, असे उपस्थित सर्वांनी सांगितले.