जळगाव, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील युवा साधकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन दिवसीय शिबीर जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आयोजित करण्यात आले होते. त्यात सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जीवनात साधनेची आवश्यकता, धर्मकार्यात सहभागी होण्याचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबिरात साधना, सत्संग, सत्सेवा यांचे महत्त्व विषद करण्यात आले. तसेच वृत्तलेखन, वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन कसे करावे ? सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर कसा करावा ? स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे ? याविषयी उद्बोधन करण्यात आले. विविध विषयांवर गटचर्चाही घेण्यात आली. सर्व युवा कार्यकर्त्यांनी सनातनच्या आश्रमात येऊन सेवा करण्याची आणि धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.
शिबिरार्थींचे मनोगत
१. मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता निर्माण झाली. आता पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा आहे. – कु. चंद्रकांत ठाकरे, पाचोरा
२. शिबिराच्या कालावधीत आश्रमात देवाचे अस्तित्व अनुभवता आले. आता नियमित नामजपासह सेवाही करणार. – कु. आकाश सोनवणे, नांद्रा
३. घरी आई नामजप करायला सांगायची, तेव्हा नको वाटायचे. शिबिरात आल्यानंतर साधनेचे महत्त्व लक्षात आले. यापुढे नामजप नियमितपणे करीन. – कु. धनश्री दहिवदकर, पाळधी