‘व्हिडिओ गेम’चे दुष्परिणाम जाणा !

‘व्हिडिओ गेम्स’चे ‘कॉम्प्युटर गेम’, ‘कन्सोल गेम’, ‘मोबाईल गेम’ असे माध्यमानुसार (यंत्रानुसार), तर खेळानुसार ‘ॲक्शन गेम’, ‘ऑर्किड गेम’ (उदा. ‘रेसिंग’), ‘टेरर गेम’ असे विविध प्रकार आहेत. हे विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांविषयी अमेरिका आणि युरोपीय देश यांमध्ये पुष्कळ संशोधन झाले आहे. त्या संशोधनात हा खेळ खेळणार्‍या मुलांवर होणारे पुढील काही दुष्परिणाम आढळून आले आहेत.


१. शारीरिक दुष्परिणाम

विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांमध्ये पोटदुखीसारखे विकार उद्भवण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते. एखादा व्यसनी माणूस जेव्हा व्यसन करतो, तेव्हा त्याच्या मेंदूत ‘डोपामिन’ नावाचे रसायन बनते अन् त्यामुळे तो उत्तेजित होतो. विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांच्या मेंदूतही हेच रसायन आढळून आले आहे.

२. मानसिक दुष्परिणाम  

विध्वंसक खेळ खेळणारी मुले खेळ खेळून झाल्यावर पुढच्या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्वंसक वागतात. विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांमध्ये वाईट स्वप्ने पडून भीतीने थरथरत उठण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’
– डॉ. स्वप्नील देशमुख, समुपदेशक मानसोपचारतज्ञ (कन्सल्टिंग सायकिॲट्रिस्ट), पुणे. (दैनिक ‘लोकमत’, ७.१०.२०११)