गोशाळेच्या माध्यमातून २०० गोवंशियांचा सांभाळ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चालवणार्‍या जाणार्‍या गोशाळेच्या माध्यमातून २०० लहान आणि मोठ्या अशा गोवंशियांचा सांभाळ केला जात आहे. गायींपासून मिळणारे दूध हे प्रतिदिन नैमित्तिक पूजेसाठी वापरण्यात येते, तर उर्वरित दूध हे रुग्णाईत, तसेच लहान बालकांचे पालक यांना विक्री केली जाते.

‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक यांच्या घरांवर देहली पोलिसांच्या  धाडी

भाजपचे अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन केल्याचे प्रकरण

प्रशासकीय नियोजनशून्यतेमुळे वारकर्‍यांच्या पदरी उपेक्षाच !

आषाढी-कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी, वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी, तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो; मात्र त्याचा वारकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ किती होतो ?, याविषयी भलेमोठे प्रश्‍नचिन्हच आहे.

नेपाळमध्ये हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण !

२० हून अधिक हिंदू आणि पोलीस घायाळ !
हिंदूंविरुद्धच गुन्हे नोंद
हिंदु सम्राट सेनेच्या अध्यक्षाला ठार मारण्याचे होते षड्यंत्र !

भारतात ‘डिजिटल करन्सी’चा आरंभ !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबर या दिवशी देशाच्या पहिल्या ‘डिजिटल करन्सी’चा, म्हणजेच पहिल्या आभासी चलनाचा आरंभ केला. या प्रकरणी पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून रिझर्व बँकेने ‘सीबीडीसी’, म्हणजेच ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी होलसेल’ जारी केली आहे.

इलॉन मस्क यांच्याकडून आता ट्विटरचे संचालक मंडळ विसर्जित !

यापूर्वी मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, तसेच अन्य अधिकारी विजया गड्डे आणि नेड सेगल यांना हटवले होते.

(म्हणे) ‘हिंदू रचत आहेत भारतातील २० कोटी मुसलमानांच्या नरसंहाराचे षड्यंत्र !’

भारतात आतंकवाद, दंगली, लव्ह जिहाद आदी हिंसक घटना घडवून हिंदूंचा नरसंहार कोण करत आहे, हे जगजाहीर आहे ! याकडे अशा संघटना जाणूनबुजून कानाडोळा करतात आणि ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ यानुसार हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंना अपकीर्त करतात !

पुलवामामधील आक्रमणात ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बाबा वेंगा यांनी वर्ष २०२३ विषयी सांगितलेली भाकिते खरी ठरल्यास जगात उलथापालथ !

सनातन गेली २ दशके ‘जगात आपत्काळ येईल’, असे सांगत आहे. त्याच दिशेने जगाची वाटचाल चालू आहे, हेच यातून लक्षात येते !

खलिस्तान्यांना आर्थिक साहाय्य करा, शस्त्रास्त्रे पुरवा आणि त्यांना भारतामध्ये अशांतता पसरवण्याची चिथावणी द्या !

भारतविरोधी शक्तींना उकसवण्यामागे जिहादी पाकचाच हात असल्याने आता त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी भारतानी रणनीती आखणे आवश्यक !