अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदु आणि मुसलमान तृतीयपंथी यांच्यात वाद

मुसलमान तृतीय पंथियांकडून हिंदु तृतीय पंथियांंवर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान आणि हिंदु तृतीय पंथियांनी यांच्यात क्षेत्रावरील अधिकारावरून झालेल्या वादातून दोघे समोरासमोर उभे ठाकल्याची घटना येथे नुकतीच घडली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या वेळी हिंदु तृतीय पंथियांनी आरोप केला की, मुसलमान तृतीयपंथी त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणत होते.

१. गेल्या ५९ वर्षांपासून दोन्ही धर्मांतील तृतीय पंथियांना अलीगड शहरातील परिसर विभागून देण्यात आले आहेत. त्यांनी त्या त्या विभागांत त्यांचे काम करण्याचे ठरवण्यात आले आहे. आता यातील एका गटाचे म्हणणे की, मुसलमानांनी मुसलमानांच्या घरी, तर हिंदूंनी हिंदूंच्या घरी जाऊन त्यांचे काम करावे. हिंदु तृतीय पंथियांचे म्हणणे आहे की, मांसाहारी तृतीय पंथियांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकरल्या जाणार नाहीत.

२. हिंदु तृतीय पंथियांनी आरोप केला की, मुसलमान तृतीयपंथी बाहेरून गुंडांना बोलावून त्यांना आम्हाला मारहाण करायला लावतात. या प्रकरणी हिंदु तृतीयपंथी शिवा यांनी सांगितले की, त्यांच्यावर एकदा गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे त्यांच्या समाजाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

३. हिंदु तृतीय पंथियांचा आरोप आहे की, मुसलमान तृतीयपंथी हिंदु तृतीय पंथियांवर मांस खाण्यास आणि नमाजपठण करण्यास दबाव आणतात, तसेच इस्लामही स्वीकारण्यास सांगतात. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष तक्रारीमध्ये त्याची नोंद करण्यात आली नाही. (उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा भेदभाव होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आता तृतीयपंथी धर्मांध मुसलमानांनीही हिंदूंवर अशा प्रकारचा दबाव आणणे, हे हिंदूंना अत्यंत लज्जास्पद आहे ! आता तरी हिंदु स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी संघटित होऊन कृतीशील होतील का ?