स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे नैराश्यात वाढ होते ! – अमेरिकेतील सर्वेक्षण


‘स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे एकटेपणासह नैराश्य आणि चिंता यांनी व्यक्ती ग्रासली जाते, असे अमेरिकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्मार्टफोनचे व्यसन आणि न्यूरॉलोजी या संदर्भातील संशोधन ‘न्यूरो रेग्युलेशन’ या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’)