देहलीचे आप सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचे त्यागपत्र

आम आदमी पक्षाच्या राजेंद्र पाल गौतम यांनी त्यागपत्र दिले तत्पूर्वी हिंदु संघटनांनी त्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचे पठण करून तेथे भगवा ध्वज फडकावला होता.

‘अल्ट न्यूज’च्या हिंदुद्वेष्ट्या सहसंस्थापकांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेच नाही ! – ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनी

भारत आणि हिंदू यांचा वारंवार द्वेष करणार्‍या ‘अल्ट न्यूज’चे उदात्तीकरण करणार्‍या ‘टाइम’ नियतकालिकावर आता भारतात बंदीच लादली पाहिजे !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी प.पू. महाराजांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना वेळोवेळी मार्गदर्शन अन् त्यांचा आशीर्वादही लाभले.

पुणे येथील श्री गौड ब्राह्मण समाज यांच्या दुर्गामाता मंदिरात नवरात्रीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत व्याख्यान

श्री गौड ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी समितीला सन्मानचिन्ह दिले.

नागरिकांच्या आत्महत्यांना स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे उत्तरदायी !

‘पाश्‍चात्त्य देशांत अन्न-वस्त्र-निवारा असूनही मानसिक अस्वास्थ्यामुळे तेथील नागरिक आत्महत्या करतात. याउलट भारतातील जनतेच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सरकारांनी पूर्ण न केल्यामुळे येथील नागरिक आत्महत्या करतात. हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पैसा घेत होते, रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवणार आहेत का ?

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला !

मेळाव्याला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, सनातनच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि  हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.

सातारा येथे पुढील वर्षीचा ‘दसरा महोत्सव’ शासनाच्या सहकार्यातून होणार ! – शंभूराज देसाई

मंत्री देसाई पुढे म्हणाले की, सातारा येथील ‘शाही दसरा महोत्सवा’विषयी माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनीही याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.